नगर : जिल्हा परिषद उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत रंगले सोशल वॉर

नगर : जिल्हा परिषद उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत रंगले सोशल वॉर
Published on
Updated on

दीपक वाघमारे:

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गटाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये चांगलेच सोशल वॉर रंगले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत पुरती संभ्रामवस्था पहायला मिळत आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे. पूर्वीचा येळपणे गट आता नव्याने पिंपळगाव पिसा गट झाला आहे. येळपणे गणातील बहुतांश गावे बेलवंडी गटाला जोडली गेली आहेत. त्यामुळे उमेदवारीची समिकरणेही बदलली आहेत.

जुन्या येळपणे गटासह नव्या पिंपळगाव पिसा गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून अतुल लोखंडे यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कायकर्ते आमचा विठ्ठल देवदैठणमध्ये राहतो, असे सांगून भावी जिल्हा परिषद सदस्य अतुल लोखंडे अशा पोष्टही फिरवत आहेत.

काहींनी माजी आमदार राहुल जगताप यांच्या सौभाग्यवती डॉ. प्रणोती जगताप यांचीही पोष्ट फिरवत चांगलेच सोशल वॉर रंगवले आहे. अशातच एक पोष्ट पाहून कार्यकर्त्यांत मात्र पुरती संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उमेदवारीचे दावेदार अतुल लोखंडे यांनीच स्वतः डॉ. प्रणोती जगताप यांची पोष्ट स्टेटसला ठेवून समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही बुचकळ्यात पाडले आहे.

लोखंडे यांचे स्टेटस पाहून अनेकांनी त्यांना त्याबाबत विचारले. त्यावर लोखंडे यांनी केवळ 'वेट अ‍ॅण्ड वॉच' म्हणत बोलणे टाळले.
पिंपळगाव पिसा गटाची जिल्हा परिषदेची उमेदवारी कोणाला मिळेल हा भाग वेगळा; पण आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मात्र पुरती संभ्रामवस्था निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे.

जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी, हा हेतू कधीच न ठेवता सहकार्‍यांसोबत पक्ष बळकटीसाठी जुन्या येळपणे गटात काम केले. तरुणतुर्क व चांगल्या कार्यकर्त्यांची फळी तयार केली. पक्षाला गटात चांगले नेतृत्व मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहिलो. त्यामुळे उच्चशिक्षित, कुकडी कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी या गटाची उमेदवारी करावी, अशी इच्छा आहे.
-अतुल लोखंडे
अध्यक्ष, देवदैठण सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news