पुणे

शनिवार पेठ, कळस परिसर झाला स्वच्छ !

अमृता चौगुले

पुणे : शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदी पात्रातील रस्त्यावर साचलेला कचरा उचलण्याचे काम प्रशासनाने गुरुवारी (दि. 16) सुरू केले. दैनिक 'पुढारी'ने तिसरा डोळा- या सदरामध्ये मंगळवारी हा विषय मांडला होता. मंदिरालगत असलेल्या समाधी मंदिरातील जागेवर पावसाच्या पाण्याबरोबर आलेली घाण पडून होती.

प्रशासनाने 'पुढारी'च्या वृत्ताची दखल घेत दुपारी कचरा उचलण्यास सुरुवात केली. दुसरीकडे कळस परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाबाहेर कचरा टाकून रस्ता बंद करण्यात आला होता. 'पुढारी'ने सचित्र वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि कचरा उचलून स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करून दिले.

'तिसरा डोळा' पुणेकरांचा….

तुम्हाला पुण्यात फिरताना, रोजचं जगणं जगताना अनेक गोष्टी खटकत असतात. कुठं सिग्नल बंद पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो, तर कुठं रस्ताभर खड्डेच खड्डे पडलेले असतात… या गोष्टी चव्हाट्यावर आल्या, म्हणजे तुमच्या आवडत्या 'पुढारी'त प्रसिद्ध झाल्या, तर त्याला तोंड फुटू शकतं आणि महापालिका-सरकारी यंत्रणा हलू शकते.

तुम्ही एवढंच करायचं… अशा अडचणीच्या गोष्टीचा फोटो किंवा फोटो काढता येत नसेल, तर संबंधित तक्रार चार ओळीत लिहून 'पुढारी'ला 9823158113 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप करायची. वाचकांनी मांडलेले असे प्रश्न 'पुढारी' दर आठवड्याला मांडणार आहे. चला तर मग… उचला मोबाईल आणि हा नंबर सेव्ह करून 'पुढारी'ला आपल्या अडचणी पाठवत राहा…

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT