कालठण, पुढारी वृत्तसेवा: नोकरीचा 12 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम 1 जूनपासून सुरू झाला. महिनाभराच्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील सुमारे 95 हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. प्रशिक्षण सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. वेबसाइटवर नुसते 'गोल'च फिरत असून, प्रशिक्षण काही होत नसल्याच्या तक्रारी शिक्षक करीत आहेत.
राज शिक्षण मंडळाने स्वत: प्रशिक्षण न घेता एका कंपनीला हे काम दिले आहे, अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना मंडळाकडून सहभागी होण्यासाठी एक लिंक, एक लॉगिन आयडी पाठविण्यात आला आहे. अनेक शिक्षकांना प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी लिंक आली नाही. काहींना लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली तरी प्रशिक्षण सुरू होत नव्हते. देखभालीसाठी वेबसाईट बंद राहणार, असा संदेश दाखविला जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या. ग्रामीण भागात रेंज नसल्याने अनेक अडचणींचा शिक्षकांना सामना करावा लागत आहे.
या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये घेतले आहेत. शुल्क आकारून कोणतीही सुविधा शिक्षकांना नाही. उलट मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे. खरे जिल्हास्तरावर ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांचे गट करून प्रशिक्षण घ्यायला पाहिजे होते. असाइन्मेंट अपलोड करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे शिक्षण संघटनांचे म्हणणे आहे.
हेही वाचा