पुणे, पुढारी वृत्तसेवा: विवाहाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तरुण सुनील रॉय (रा. आर्च स्मिथ सोसायटी, धानोरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपी रॉय याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर रॉयने तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. रॉयचा विवाह झाला होता. त्याने ही बाब महिलेपासून लपवून ठेवली होती. त्यानंतर रॉयने महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. विवाहाबाबत महिलेने विचारणा केली तेव्हा त्याने नकार दिला. रॉयचा विवाह झाल्याचे समजल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी शुभम सुधीर शेळके (वय 26, रा. कोंढवा खुर्द) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम आणि तरुणी ओळखीचे आहेत. त्याने तरुणीला आमिष दाखवून बलात्कार केला. विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तरुणीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक वगरे तपास करीत आहेत.
हेही वाचा