पुणे

वारीमध्ये बोगस डॉक्टरांना चाप

अमृता चौगुले

पुणे: पुढारी वृत्तसेवा: वारीमध्ये वारकर्‍यांना काही बोगस डॉक्टरांकडून उपचार करण्याचे प्रकार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याला आळा घालण्यासाठी या वर्षी खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. वारीमध्ये असे बोगस डॉक्टर उपचार करताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांना आरोग्य सुविधा सेवा पुरविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. यात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, आरोग्य दूत, आरोग्य किट, फिरत्या दवाखान्यांची सुविधा करण्यात आली आहे. फिरत्या रुग्णवाहिका पथकांमध्ये कोरोना चाचणी केली जाणार आहे.

वारीच्या वाटेवर 87 वैद्यकीय पथके

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 29 वैद्यकीय पथके असणार आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असेल. त्याप्रमाणे 6 रुग्णवाहिका, 25 पाण्याचे टँकर, आरोग्य किट वारकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या आरोग्य किटमध्ये 12 प्रकारचे औषधोपचार उपलब्ध असतील. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातही 58 वैद्यकीय पथके, 17 रुग्णवाहिका, पाणीपुरवठ्यासाठी 48 टँकर, आरोग्य किट दिले जाणार आहेत. जवळपास 1 हजार आरोग्य किटचे वाटप केले जाणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT