उंडवडी : पुढारी वृत्तसेवा
उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे 5 जून रोजी रात्री आठ वाजेनंतर वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वार्याचा जोर इतका होता की मोठी झाडे उन्मळून पडली, तर पिकांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाले.
उंडवडी सुपे येथील शेतकरी सुमन किसन चांदगुडे यांची पोल्ट्री गट नं. 129 (मालक वस्तीशेजारी) येथे असून रविवारी रात्री झालेला पाऊस व वादळी वार्याने पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान होऊन भिंतीसह पत्रेही उडाले.
त्यात जवळपास 3 हजार 700 पक्षी होते. यातील बरेच पक्षी मरण पावल्याने मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 2 ते 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित विभागाकडून पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी चांदगुडे कुटुंबीयांनी केली आहे.
दुसरीकडे उंडवडी कप येथील शेतकरी योगेश ढवळे यांच्या आंबा फळझाडांची फळे गळून नुकसान झाले, तर उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात झाडे पडली.
हेही वाचा