पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे सहकार व कृषी क्षेत्रात मोठे कार्य आहे. शेट्टी यांचे हे योगदान विचारात घेतले. त्यासाठी आम्ही त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या प्रस्तावात सामिल केले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा-
पवार म्हणाले की राज्यपालांना देण्यासाठी जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राष्ट्रवादीकडून दिली. त्यात आणि राज्यपालांना दिलेल्या प्रस्तावात राजू शेट्टींचे नाव आहे.
अधिक वाचा-
पण, त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तो निर्णय राज्यपाल घेतील. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही कोणाचेही नाव वगळलेले नाही. त्यांनी काय बोलावे, विचार करावा. यावर आम्ही बोलणार नाही. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा-
ईडी यंत्रणा आतापर्यंत देशात अशाप्रकारे कधी वापरली नव्हती. हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नमवण्याच्या संदर्भात केलेला दिसतेय. त्यामुळे राज्यातच नाही; पंजाब, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही कारवाई होतेय. हा वापर महाराष्ट्रापुरता सिमीत नाही. अन्य राज्यात ईडीची कारवाई सुरु आहे, असे पवार म्हणाले.
राज्यात जे लोक केंद्र सरकारच्या विचारांची आहेत. त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. त्यावर पवार म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे. असा निर्देश आहे.
संवेदनशील राजकारणी असतील तर त्यांनी अन्नदात्याचा विचार करायला हवा होता, असे पवार यांनी सूचित केले आहे.
पवार म्हणाले पुढे म्हणाले की इतके दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत. त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. पण, हे दुर्देव आहे.
हेदेखील वाचा-