पुणे

योद्ध्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यात खा.धनंजय महाडीक टिळक, जगतापांना भेटले

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोघांमुळे राज्यसभेवर भाजपच्या तीन उमेदवारांचा विशेषतः माझा विजय सुकर झाला. या दोघांची भेट घेतल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोल्हापूरला जाणे मला उचित वाटत नाही. त्यांना भेटण्यासाठी म्हणून मी पुण्यात आलो,' असे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांनी शनिवारी रात्री 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.

जगताप व टिळक आजारी आहेत. तरीदेखील ते शुक्रवारी राज्यसभेच्या मतदानासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या मतामुळे भाजपचे उमेदवार विजयी झाले. जगताप यांना घरी रात्री साडेनऊ वाजता भेटून महाराडीक रात्री साडेअकरा वाजता टिळक यांना भेटण्यासाठी कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत भाजपचे नेते संदीप खर्डेकर होते.

महाडीक म्हणाले, 'या दोघांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांना भेटलो. पक्षावरील प्रेमापोटी ते आजारी असतानाही मतदानासाठी आले. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कोल्हापूरला जाऊन गुलाल उधळणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी आज त्या दोघांना भेटलो. मी पुण्यात मुक्काम करणार असून, रविवारी कोल्हापूरला जाणार आहे.'

प मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर महाडीक शनिवारी रात्री आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली. जगताप कुटुंबियांच्या वतीने महाडीक यांचे औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT