रस्ता दुभाजकाची झाली दुरावस्था, देहू- आळंदी रस्त्यावरील परिस्थिती | पुढारी

रस्ता दुभाजकाची झाली दुरावस्था, देहू- आळंदी रस्त्यावरील परिस्थिती

तळवडे : पुढारी वृत्तसेवा : तळवडे मुख्य चौकालगत देहू आळंदी रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची दुरवस्था झाली असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. देहू आळंदी या तिर्थक्षेत्रांना जोडणार्‍या रस्त्यावर तळवडे चौकालगतचे सिमेंटचे दुभाजक निखळून गेल्याने दुभाजकांच्या मधील माती रस्त्यावर पसरली आहे.

काही सिमेंटचे दुभाजक अधांतरी ऊभे केलेले आहेत. हे सिमेंटचे दुभाजक रस्त्यात पडल्यास रात्रीच्यावेळी भरधाव वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्यामुळे येथील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. काम संपूनही येथील दुभाजक व्यवस्थित बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुभाजकांची दुरवस्था झाली आहे.

दुभाजकाच्या करण्यात आलेल्या कामाच्या गूणवत्तेवर नागरीकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून तळवडे मुख्य चौकातील वाहतूक लक्षात घेता हे दुभाजक व्यवस्थित बसवावेत, अशी मागणी परीसरातील वाहनचालक व नागरिकांतून करण्यात येत आहे.
पावसाळ्यापूर्वी येथील दुभाजकांची डागडुजी करण्यात यावी. अन्यथा दुभाजकामधे झाडासाठी टाकलेली माती वाहून जाऊ शकते. ही माती रस्त्यावर पसरल्यास वाहन चालकांना अपघातास सामोरे जावे लागू शकते, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

 

Back to top button