पुणे

यवत पोलिसांची वाहतूक वळविण्यासाठी लगीनघाई; वैष्णवांचा पालखी प्रवास सुखकर होण्यासाठी तयारी

अमृता चौगुले

केडगाव : पुढारी वृत्तसेवा: वैष्णवांचा मार्ग सुखकर राहिला पाहिजे, यासाठी कायम वर्दळीत असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या वाहतुकीचे नियोजन यवत पोलिस अधिकारी नारायण पवार यांनी चोख केले आहे. दौंड तालुक्यात संत तुकोबाराय पालखीचे आगमन शनिवारी (दि. 25) पूर्वसंध्येला हवेली आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर बोरीऐंदी गावच्या सीमेवर होणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील तिचा प्रवास सुखकर कसा होईल, याचा विचार करून पवार यांनी चौफुला या ठिकाणी वाहतूक वळवली आहे.

सोलापूरकडून येणारी वाहने केडगाव रेल्वे स्टेशनमार्गे वळवली असून, त्यांना जाण्यासाठी खुटबाव, पिंपळगाव, राहूमार्गे पुण्याकडे जाणारे माहितीफलक लावले आहेत. काही अवजड वाहनांना केडगाव, पारगाव, न्हावरा, करडे आणि शिरूरमार्गे जाण्यासाठी माहितीफलक दिले आहेत. चौफुला येथे दोन ठिकाणी बंदोबस्त छावणी उभारून 30 पोलिस कर्मचारी आणि 6 अधिकारी यांचे पथक तैनात केले आहे.
सध्या चौफुला या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या असून, काही अवजड वाहने रस्त्याच्या कडेला लावून चालक विश्रांती घेताना दिसत आहेत. पालखी येण्याअगोदर दोन दिवसांची ही तयारी प्रथमच केली गेली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT