पुणे

माळेगाव साखर कारखाना होतोय हायटेक; ऊसलागण, तोडणी व वाहतूक यांचे अ‍ॅपद्वारे व्यवस्थापन

अमृता चौगुले

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर : माळेगाव कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याचे झालेले विस्तारीकरण आणि उच्चांकी गाळप याचा बोलबाला असतानाच कारखाना प्रशासन पुढचे पाऊल टाकत आहे. आधुनिक तंत्राचा वापर करीत ऊसलागण, त्याचे व्यवस्थापन, तसेच तोडणी, वाहतूक यंत्रणा यांचे दैनंदिन कामकाज व त्याचे नियोजन यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी कारखान्याने एक अ‍ॅप विकसित केले आहे. याचा वापर करीत पेपरलेस कामकाजावर भर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऑनलाइन लागण नोंद

ऊसउत्पादक शेतकरी आपल्या शेतातून लागण केलेल्या क्षेत्राची नोंद करतील, तसेच नोंद झालेल्या क्षेत्राची मोजणी आणि ऑनलाइन ऊस रुजवात आणि निरीक्षण करता येईल.

स्मार्ट ऊसतोडणी

ऑनलाइन अ‍ॅपद्वारे ऊसतोडणी फिल्ड स्लिप ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोबाईलवर दिली जाणार आहे. शेतातून तुटलेला ऊस किती कालावधीमध्ये गाळप झाला, तसेच फील्डमनने दिलेली स्लिप आणि तुटलेला ऊस हे बरोबर असल्याची खात्री दररोज केली जाणार आहे.

एमआयएस अ‍ॅप

मोबाईलवर चालू गाळप हंगाम स्थिती, यार्डमध्ये शिल्लक वाहने व ऊस, तसेच उसाची नोंद व गाळप अहवाल याबाबत माहिती मिळणार आहे.

स्मार्ट वाहन ट्रॅकिंग

ऊस वाहनांचे ट्रॅकिंग होऊन ऊस लागण क्षेत्राची भौतिक स्थिती, प्रत्यक्षात कारखाना कार्यस्थळापासून ऊसतोडणीचे अंतर तसेच तोडणीसाठी गेलेले वाहन किती काळ थांबले, तसेच ऊसतोडणी व वाहतूक यामधील कालावधी याची नोंद होईल.

केनयार्ड व्यवस्थापन

यामध्ये आरएफआयडी या तंत्राचा वापर करीत कारखाना कार्यस्थळावर एखादे ऊस वाहतूक करणारे वाहन ऊस घेऊन आले, तर त्या वाहनाचे स्कॅनिंग होऊन त्याचा नंबर आपोआप लावला जाईल.

कर्मचारी रूट ट्रॅकिंग

शेती विभागाचा कर्मचारी कोणत्या फिल्डवर काम करीत आहे, त्यांनी एकूण किती प्रवास केला, तसेच तो ज्या ठिकाणी काम करीत आहे त्याची ऑनलाइन माहिती मिळेल. या कर्मचार्‍यांची काम करीत असलेल्या ठिकाणावरुन ऑनलाइन हजेरी नोंदवली जाईल.

शेतकरी अ‍ॅप/वाहतूकदार अ‍ॅप

यामध्ये शेतकर्‍यांना उसाची केलेली नोंद, तुटून गेलेल्या उसाच्या खेपा, त्याचे काट्यावर भरलेले वजन, तसेच ऊस बिलापोटी होणारी कपात आणि मिळणारी रक्कम, याची अचूक माहिती मिळणार आहे.

स्मार्ट वजन काटा

आरएफआयडी तंत्राचा वापर करून कर्मचारीरहित सेन्सरचा वापर होऊन काट्यावर ऊस घेऊन आलेल्या वाहनाचे अचूक वजन होऊन तशा प्रकारचा संदेश संबंधित चालक आणि वाहतूकदारांना दिला जाईल.

आधुनिक तंत्राचा वापर केल्याने शेती विभाग आणि तोडणी व वाहतूकदार, तसेच प्रशासन यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येऊन ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कारखाना यांच्या हिताच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे.

                         बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

https://youtu.be/m5yyfqkYqY4

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT