करिश्माचे हॉट रूप!

करिश्माचे हॉट रूप!
करिश्माचे हॉट रूप!
Published on
Updated on

करिश्मा कपूरने एके काळी आपल्या हॉट रूपाने आणि गाण्यांनी पडदा गाजवला होता. लग्न, घटस्फोट, दोन वाढत्या वयातील अपत्ये यामध्ये गुंतून गेलेली करिश्मा आता पुन्हा एकदा कात टाकून लोकांसमोवर नव्या रूपात येत असल्याचे दिसते. आता तिने सोशल मीडियात स्विमिंग पूलमधील बिकिनीतील एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. समुद्राकडे पाहत उभी असलेली करिश्मा यामध्ये दिसते.

हा फोटो पाहून नेटकर्‍यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी तिला हे शोभत नसल्याचे सांगितले. मात्र, आता करिश्मा चित्रपटसृष्टीत एक नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे असेच तिच्या या नव्या हालचालींवरून जाणवत आहे. शिडशिडीत अंगकाठीच्या करिश्माने आपले वजनही थोडे वाढवले असल्याचे अलीकडेच दिसून आले होते. कदाचित तिच्या एखाद्या आगामी चित्रपटाची ही पूर्वतयारी असावी!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news