पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालसंगोपन रजेवर असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना पुण्यातील धनकवडी भागात रविवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
पूजा दत्तात्र्य कांबळे/सपकाळ (वय-२८,रा.पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एक नऊ महिन्याचे बाळ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा या पुण्यातील धनकवडी येथील घरात कुटुंबासमवेत राहत होत्या. रविवारी रात्री त्या खोलील दुसऱ्या मजल्यावर राहत हाेत्या. त्यांच्या पतीने दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांना बोलावण्यासाठी आवाज दिला असता, दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता, त्या दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
त्यावेळी बेडरुम मधील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या मिळून आल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
हेही वाचलं का ?