पुणे

भाजप कार्यकर्त्यांनी बूथपातळीवर समन्वयाने काम करावे : शिव प्रकाश

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावावी. भाजप कार्यकर्त्यांनी बूथपातळीवर समन्वयाने काम करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश यांनी केले. शिव प्रकाश यांच्या उपस्थितीत बारामतीत भाजप पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, योगेश बाचल, नवनाथ पडळकर, अशोक टेकवडे, कांचन कुल, शरद ढमाले, जालिंदरभाऊ कामठे, शेखर वडणे, आकाश कांबळे, अभिजित देवकाते व बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरिता कार्यकर्त्यांना सूचना त्यांनी दिल्या. शेतकरी, महिला, युवक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी व समाजातील वंचित घटक यांच्यासाठी मोदी सरकारने केलेले क्रांतिकारी निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT