केडगाव, पुढारी वृत्तसेवा: दहा मिनिटांच्या धुवांधार पावसाने भांडगाव परिसरात मोठी धम्माल उडवली. शेतातील सर्या पाण्याने भरून वाहू लागल्याने काही क्षणातच नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. 11 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता.
पावसाळ्यातील हा पहिलाच प्रसंग नागरिकांना घामाने कासावीस करणारा होता. असे असतानाच दुपारच्या दीड वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि जोराचा पाऊस सुरू झाला आणि अचानक आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची धमाल उडवली.
शेतात विसावलेल्या धनगरांच्या वाड्याला पावसाच्या पाण्याने वळसा घातल्याने त्यांच्या प्रपंचिक वस्तूंना मोठी हानी पोहचली.
आई-वडील बकर्या चारण्यास गेलेल्या असल्याने वाड्यावर असलेल्या मुलींना या प्रसंगाला तोंड द्यावे लागले. पावसाळ्यातील हा दहा मिनिटांचा पहिलाच पाऊस मात्र जोरदार आणि धमाकेदार झाल्याने सर्वत्र पावसाने उडवलेल्या तारांबळीची चर्चा होती.
हेही वाचा