पुणे

पुरंदर पोलिस यंत्रणेच्या कामावर भाजपाचे प्रश्नचिन्ह

अमृता चौगुले

सासवड : पुढारी वृत्तसेवा

गेल्या वर्षभरापासून पुरंदर तालुक्यातील पोलिस यंत्रणेकडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करून
पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत तक्रारींचा पाढा वाचला. सर्वसामान्य लोकांच्या मागे भाजप असून नागरिकांनी भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन जगदाळे यांनी केले.

सासवड येथे दोन कचरावेचकांच्या मृत्यूनंतर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सासवड पोलिस ठाण्याला भेट देऊन, घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. तपासी अधिकारी बदलला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका भाजपाच्या वतीने सासवड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे गिरीष जगताप, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, जालिंदर जगताप उपस्थित होते.

यावेळी जगदाळे यांनी, पुरंदर तालुक्यातील पोलिस यंत्रणेवर सत्ताधार्‍यांचा दबाव आहे. पोलिसांकडून सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. न्याय मागणार्‍यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. काँग्रेसचा एक कार्यकर्ता तालुक्याचा गृहमंत्री असल्यासारखा पोलिस ठाण्यामध्ये वावरत असून पोलिसांच्या कारभारात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप गंगाराम जगदाळे यांनी केला. महाविद्यालयीन मुली सुरक्षित नसून पोलिसांनी दामिनी पथक कार्यान्वित करण्याची मागणी साकेत जगताप यांनी केली.

SCROLL FOR NEXT