पुणे

पुतणी, पुतण्यावर अत्याचार; काकाला ठोकल्या बेड्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा; काकाने आपल्या अल्पवयीन पुतणी आणि पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी 30 वर्षीय नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. चार महिन्यांपूर्वी पती घर सोडून गेल्यानंतर दोन मुले आणि फिर्यादी महिला भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रसूतीसाठी ती ससून रुग्णालयात दाखल झाली. घरी कोणी नसल्यामुळे शेजारच्या लोकांना सांगून 8 वर्षांचा मुलगा व 4 वर्षांच्या मुलीला घरी ठेवली. आरोपी दीर त्यांना घेऊन स्वत:च्या घरी गेला. महिलेने घरी आल्यावर मुलीची व मुलाची अवस्था पाहिल्यावर चौकशी केली.

या दोघांनी सांगितलेल्या हकीगतीने जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणाचा सहारा नसल्यामुळे मूग गिळून बसणे हाच पर्याय तिच्यापुढे होता. मात्र, मुलांची झालेली अवस्था पाहून तिने हिंमत करून पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा (वय 8) व मुलगी (वय 4) आहे. तिने दुसर्‍या व्यक्तीसोबत विवाह केला. गेल्या 5 महिन्यांपासून ती त्या पतीसोबत राहते. 23 मे रोजी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. तिने मोठ्या दिराला फोन करून बोलावले. त्यांनी तिला घरी सोडले. घरी आल्यानंतर मुले दिसली नाहीत. त्यामुळे तिने शेजारी चौकशी केली.

त्या वेळी तिचा धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या घरी गेल्याचे समजले. दुसर्‍या दिवशी ती दिराच्या घरी जाऊन मुलांना घेऊन आली. मुलांच्या अंगावर वळ दिसल्याने तिने विचारल्यावर दिराने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुसर्‍या दिवशी मुलांना अंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या मुलीने सांगून त्याचा खूप त्रास होत असल्याचे सांगितले. मुलाचीही तीच अवस्था होती. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT