पुणे

पुणेकरांचा वारकर्‍यांना मदतीचा हात

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दोन्ही पालख्यांसोबत पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकर्‍यांच्या खाण्याची, राहण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत पुण्यात सामाजिक, आरोग्य संस्था आणि गणेश मंडळांनी मोठा मदतीचा हात दिला. वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत जिज्ञासा ग्रुपच्या वतीने औषधे उपलब्ध करून दिली.

कोरोनाची भीती न बाळगता वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांची तपासणी केली. व्यापारीवर्गाकडून महाप्रसाद मे. चेनसुखलाल माणिकचंद पेढीच्या वतीने 8 दिंड्यांच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़. या वेळी दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, संजय चोरबेले उपस्थित होते़.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT