पुणे

पुणे शहरात कोरोनाचे नवीन 996 रुग्ण

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या चौथ्या लाटेत पुणे जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक 996 रुग्णांची नोंद झाली. मात्र, कोरोनाच्या काही रुग्णांचे अहवाल शनिवारचे असून, त्याचा समावेश रविवारच्या आकडेवारीत केल्याने ही संख्या वाढल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.
शहरात आढळलेल्या रुग्णांची संख्या 672 इतकी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 225 आणि ग्रामीणमध्ये 99 रुग्ण आढळून आले आहेत. पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी राहिल्याने पुण्याला राज्य शासनाकडून कोरोना रुग्ण वाढण्यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बीए 4 व बीए 5 या नवीन व्हेरिएंटची बाधा झालेले रुग्ण आढळून येत असून, त्यांची संख्या पुणे, मुंबईत वाढताना दिसून येत आहे.

आणखी पाच रुग्ण
राज्यात बीए 4 व्हेरिएंटचे 3 तर बीए 5 व्हेरिएंटचे 2 असे एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तीन पुरुष, तर दोन स्त्रिया आहेत. सर्व रुग्ण मुंबई येथील असून, त्यांचा अहवाल पुणे बी. जे. वैदयकीय प्रयोगशाळेने दिला आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या 54 झाली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT