संतोष शिंदे
पिंपरी : कोरोनानंतर पहिल्यांदाच आषाढी वारीचा सोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे यंदा वारकरी मोठ्या संख्येने आळंदी आणि देहूमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे घातपात विरोधी हालचाली टिपण्यासाठी पोलिसांनी यंदा मोबाईल सर्व्हीलन्स व्हॅनची मदत घेतली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मागील दोन वर्षे आषाढी वारी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्याने वारकरी मोठ्या उत्साहात आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाले आहेत. यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पादुका प्रस्थान सोहळा संपन्न होत असल्याने वारकर्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
पंढरपूरकडे प्रस्थान करणार्या या दोन्ही पालख्यांसोबत लाखो भाविक वारकरी असतात. त्यामुळे पालखी मार्गावर, मुक्काम व विसाव्याच्या ठिकाण काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला आहे. तसेच, पालखी सोहळ्यादरम्यान आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेर्याने चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पालखी मार्गावर फुले, फळ, खेळणी विक्रेते यांना हातगाड्या लावून
मोबाईल सर्व्हीलन्स व्हॅनमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. प्रामुख्याने याचा वापर दंगल सदृश्य परिस्थितीत केला जातो. व्हॅनच्या टपावर पीटीझेड (फिरता), वेहिकल एचडी आणि वायरलेस कॅमेरे आहेत. यासाठी लागणारे व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर व्हॅनमध्ये बसवण्यात आले आहे. तसेच, आतमध्ये 55 इंच एलईडी टीव्ही, लॅपटॉपची देखील सुविधा देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मिटिंग रूम म्हणून देखील व्हॅनचा वापर करता येतो. याव्यतिरिक्त एलईडी लाईट, स्पीकर, सायरण, दंगल प्रतिबंधक उपकरणे, प्रथम उपचार पेटी, जनरेटर यासह अग्निशमनसाठी लागणारे साहित्य व्हॅनमध्ये आहे. अशा तीन व्हॅन वारीवर वॉच ठेऊन असणार आहेत.
हेही वाचा