पुणे

पिंपरी: मुख्य बाजारांतील पार्किंगचा प्रश्न होतोय गंभीर

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी मार्केट असो वा चिंचवडमधील दवाबाजार नागरिकांची पार्किंगबाबत मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वाहतूक खोळंबा होत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. याठिकाणी लावण्यात येणार्‍या वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीवर तोडगा काढावा, अशी विक्रेत्यांची मागणी आहे.

पिंपरी बाजारात कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, हॉटेल, हातगाड्या यांचे प्रमाण जास्त असून त्याठिकाणी ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे भरपूर गाड्या पार्क केल्या जातात. तसेच दुकानांमध्ये माल उतरवण्यासाठी टेम्पो आल्यास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ग्राहक वैतागतात याचा परिणाम व्यवसायावर होतो. अनेकदा ग्राहक दुहेरी पार्किंग करतात. तसेच चिंचवड येथील दवाबाजार येथे घाऊक औषध विक्रेत्यांची दुकाने, बँक, रुग्णालय आहे.

त्यामुळे येथे येणार्‍या नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. पुरेसे पार्किंग उपलब्ध नसल्याने ग्राहकांना पार्किंगसाठी झगडावे लागते. त्यातच सम-विषम तारखेनुसार पार्किंगची सोय केल्याने अडचणीत वाढच होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुचाकीसाठी एकेरी पार्किंगची सोय करावी, अशी मागणी दवा बाजारातील व्यावसायिक करत आहेत.

'पिंपरी बाजारात व्यावसायिक ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यात भर म्हणून पुणे शहरातून देखील ग्राहक येतात. तसेच इतर ग्राहक देखील वस्तू घेण्यासाठी येतात. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होते'

-राम चौधरी, व्यावसायिक

'दावा बाजारात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. व्यावसायिकांसह सर्व सामान्य ग्राहकांना देखील पार्किंग उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

                                      – दिनेश ओझा, दावा बाजार

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT