पुणे

पिंपरी: ओबीसी टक्केवारी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

अमृता चौगुले

पिंपरी: सर्व्हर डाऊन असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची (ओबीसी) टक्केवारी जमा करण्याचे सर्वेक्षणाचे काम खोळंबले होते. मात्र, सर्व्हर सुुरळीत सुरू झाल्याने नोंदणीचे काम सुरू होऊन सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.13) सांगितले.

महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहित व्हाव्यात म्हणून राज्य सरकार ओबीसींचा इम्पीरिकल डाटा गोळा करत आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने पालिकेला ओबीसींचे तोंडी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. पालिकेने 1 हजार 200 कर्मचारी (बीएलओ) नेमून गेल्या मंगळवारी (दि.7) काम सुरू करण्यात आले. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदार यादीनिहाय आडनावानुसार यादीनुसार ओबीसीची नोंदणीचे काम केले जात आहे.

राज्यभरात 14 महापालिकेत एकाच वेळी नोंदी केल्या जात असल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे ऑनलाइन नोंद झाल्या नाहीत आणि काम शुक्रवार (दि.10) पर्यंत पूर्ण झाले नाही.बीएलओनी कागदावर नोंदी घेतल्या. सर्व्हर सुरळीत झाल्यानंतर ऑनलाइन नोंदीचे काम करण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT