ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक; सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या दहा पथकांकडून तपास सुरू

ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक; सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या दहा पथकांकडून तपास सुरू

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी सोडवणारे पोलिसच अडचणीत सापडल्याचे चित्र आज (मंगळवार) सकाळी ठाण्यात दिसून आले. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी चक्क ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार सकाळी समोर आला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ झाली. ठाणे सायबर विभागासह गुन्हे शाखेचे दहा पथक या हॅकरचा शोध घेत असून, वेबसाईट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा सायबर हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला असून, रात्रीपासून ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या वेबसाईटवरची सगळी माहिती गायब झाली आहे. या वेबसाईटवर ठाणे पोलीस अधिकार्‍यांची माहिती तसेच त्यांचे मोबाईल नंबर्सही होते. आता मात्र या वेबासाईटवर सांकेतिक भाषा दिसत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली असून, अनेक सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेची तब्बल दहा पथके तपास करत आहेत.

हे देखील वाचलंत का?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news