चार्जिंग न करता 7 महिने धावणार कार | पुढारी

चार्जिंग न करता 7 महिने धावणार कार

अ‍ॅमस्टर्डम : सौरऊर्जेवर चालणारी कार कुणीतरी प्रात्यक्षिक म्हणून तयार केली, कुणीतरी प्रदर्शनात मांडली, असे याआधीही घडलेले आहे. पण या कारची प्रत्यक्षातील उपयुक्‍तता तशी नव्हतीच म्हणून कुणी याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही, पण लाईटइयर्स सोलर कार या डच कंपनीने सोलर कार्सचे जगातील पहिलेवहिले उत्पादन (तेही मोठ्या प्रमाणातील) बाजारात उतरविण्याची तयारी चालविली आहे.

या वृत्ताने ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून ही कार यशस्वी ठरल्यास ती एक मोठी क्रांती ठरणार आहे! मोठ्या प्रमाणात कार आम्ही तयार ठेवलेल्या असून, लवकरच त्या बाजारात उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ‘द लाईटइयर 0’ या कारसोबत 5 चौरस मीटरचे सोलर पॅनल्स आहेत. दिवसाला 70 किमीपर्यंत कार त्यावर चालू शकेल. चाचणीअंती साठ किलोव्हॅटच्या बॅटरीसह ही कार 625 किलोमीटरपर्यंत चालते, हे सिद्ध झाले आहे. वर्षाला 11 हजार किलोमीटर्सपर्यंत धावण्याची क्षमताही या कारच्या सौरछतात दडलेली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

Back to top button