टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर वारकरी नाचून-गाऊन तल्लीन झाले होते. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर वारकरी नाचून-गाऊन तल्लीन झाले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाचे वारकर्‍यांनी स्वागत केले. 
पुणे

पिंपरी: आता ओढ पांडुरंगाची; पावसासोबत हरिनामाचा गजर…

अमृता चौगुले

पिंपरी: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, चला जाऊ पंढरपुरा, दोन वर्षांपासून पंढरपूरला जाण्यासाठी वाट बघत होतो. अखेर आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणार आहोत, असे म्हणत वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाण्यास सज्ज झाले आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (दि. 20) प्रस्थान होत आहे. तब्बल दोन वर्षांनी वारकरी देहूमध्ये जमल्याने देहूनगरी दुमदुमली आहे. भजन, कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाला भेटीसाठी आळवीत आहेत.

अनेक वारकरी पंढरपूरला गेल्यावर फक्त मंदिरच्या कळसाचे दर्शन घेतात आणि पुढल्या वर्षी लवकर येतो, असे पांडुरंगाला सांगून पुढल्या वर्षीच्या वारीची वाट बघतात. दोन वर्षांपासून पांडुरंगाची ओढ असल्याने आता पाऊले चालती पंढरीची वाट, म्हणत कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन घेतो, अशी अवस्था वारकर्‍यांची झाली आहे.

पावसासोबत हरिनामाचा गजर
अबीर गुलाल.. उधळीत रंग… माझे माहेर पांढरी… नांदुरकी वृक्ष परिसर… अभंगात तल्लीन झालेले वारकरी… आणि पावसाच्या सरींनी साथ दिली… मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या वरुणराजाने अभंगाला साथ दिली. वरुणराजाच्या आगमनाने वारकर्‍यांमध्ये जोश संचारला. जून महिना अर्धा सरून गेला, तरी पावसाने हजेरी लावली नव्हती.

मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने वारकर्‍यांनी आनंदाची डोही आनंद तरंग, म्हणत पावसाचे स्वागत केले. टाळ हातात धरून उंच हातांनी आकाशाला अभिवादन केले. रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने वारकर्‍यांना आनंद झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी दंग झाले होते.

  • 21 तारखेला काय होणार
  • सकाळी 9 वा. पालखीची शासकीय पूजा.
  • तेथून पालखी खांद्यावर घेऊन शिवाजी चौकात दाखल होणार.
  • शिवाजी चौकात पालखी रथावर पालखी ठेवल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने सर्व पालखीप्रमुखांचा आरोग्य किट देऊन सत्कार.
  • मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुवासिनींकडून रथाच्या बैलजोडीची पूजा, निरोप.
  • अनगडशाहवली बाबा दर्ग्याजवळ पालखी रथातून पालखीतळावर ठेवण्यात येईल. अभंग, आरती झाल्यानंतर पालखी पुन्हा रथावर ठेवण्यात येईल.
  • तिथून दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पालखी चिंचोलीच्या पादुका मंदिराजवळ पोहचेल. तिथे रथावरील चोपदाराने चोप फिरवताच
  • अभंगाला सुरुवात व चोप उंचावल्यावर अभंगसमाप्ती. येथे अभंग आरती होते. दुपारची विश्रांती होऊन पालखी निगडीकडे मार्गस्थ होईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT