ताथवडे : पुढारी वृत्तसेवा
डांगे चौक परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे चिंचवडकडे जाणार्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याची बातमी 'दैनिक पुढारी'ने प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे.
काही महिन्यांपूर्वीच डांगे चौक येथील ग्रेड सेप्रेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. नंतर काही दिवसातच येथील पावसाळी गटाराचे काम करण्यासाठी ग्रेड सेप्रेटरपासून ते डांगे चौकपुलापर्यांत रस्ता खोदण्यात आला होता.
पावसाळी गटाराचे काम पूर्ण झाल्यानंतरही तात्पुरती डागडुजी करून हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात आला होता. मात्र रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने पादचार्यांना तसेच दुचाकीस्वारांना येथून ये-जा करणे मुश्किल झाले होते.
हेही वाचा