पुणे

पिंपरी : 22 हजार 244 वीज ग्राहकांनी दिली ‘गो ग्रीन’ला पसंती

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महावितरणतर्फे 'गो-ग्रीन' योजना ही राबविली जात असून या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ग्राहकांपैकी 22 हजार 244 ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती दिली आहे.

ग्राहकांनी कागद विरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे.

महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेच 'ई-मेल', 'एसएमएस'द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहेत.

त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाइनद्वारे तात्काळ भरण्याची पिंपरी चिंचवडकरांचा सहभाग
वीजग्राहकांनी महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT