पुणे

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची संधी; विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे

खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी टाइम्स किंवा क्यूएस रँकिंग प्रणालीत 200 च्या आत असणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्याने कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्याला योजनेत सहभागी होता येणार आहे.

त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला 8 जुलैपर्यंत. https://foreignscholarship2022.dte.maharashtra.gov.in या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. कला, वाणिज्य, विधी, विज्ञान अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी जवळच्या उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयात; तर व्यवस्थापन,

अभियांत्रिकी, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयात 11 जुलैपर्यंत शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणार्‍या विद्यार्थ्यांनाच योजनेत सादर करता येणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT