पुणे

पणदरे ग्रामविकास मंच म्हणजे वृक्ष लागवडीचा संच

अमृता चौगुले

प्रा.अनिल धुमाळ

शिवनगर : पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावातील तरुण एकत्र येऊन मागील सहा वर्षांत हजारो झाडांची लागवड करून त्याचे संवर्धनही करतात आणि तीच झाडे आज परिसराला एक नवसंजीवनी ठरत आहेत, असा हा प्रेरणादायी उपक्रम पणदरे (ता. बारामती) गावातील युवकांनी एकत्र येत पणदरे ग्राम विकास मंचाच्या माध्यमातून राबविल्याने गाव परिसरात निसर्गरम्य चित्र दिसत आहे.

5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला लेखाजोखा बरोबर सहा वर्षांपूर्वी मे महिन्यात गावातील तरुणांनी एकत्र येत पर्यावरणाच्या रक्षणासाठी पणदरे ग्रामविकास मंचाची स्थापना करून काम सुरू केले. प्रथमत: गाव, नीरा डावा कालवा स्वच्छता मोहीम हाती घेऊन फत्ते केली, नंतर 'झाडे लावा झाडे जगवा' ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवण्याची उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात होते.

झाडे लावत असताना महिन्यातील काही दिवस ठरवून सर्वांनी एकत्र येत पणदरे पंचक्रोशीतील सर्वच रस्त्यांच्या बाजूला झाडे लावली जातात, हे करत असताना कुणाचा वाढदिवस असेल, एखाद्याचे लग्न झाले, तर कुणाला अपत्य झाले, अशा वेळी आनंद उत्सव म्हणून वृक्षलागवड केली जात आहे.

दशक्रिया, सावडण्याचा विधी या दिवशी आपल्या जवळील गेलेल्या माणसाच्या स्मरणार्थ वृक्षरोपण केले जाते. पंचक्रोशीतील शाळेमध्ये पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना  प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट म्हणून दिले जाते आणि जे विद्यार्थी या रोपांचे चांगले संवर्धन करून मोठी करतील त्यांना मंचाच्या वतीने बक्षीस दिले जाते, असे उपक्रम राबविण्यात आले.

3560 झाडे डौलाने उभी

मंचाच्या मध्ये असलेल्या युवकांच्या घरामध्ये, गाडीमध्ये कायम काही रोपे असतात. परिसरामध्ये एखादी जागा वृक्ष लागवडीसाठी चांगली दिसली की त्या ठिकाणी ते रोप लावले जाते. अशाप्रकारे पणदरे ग्रामविकास मंचाच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 3700 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली असून, यामधील 3560 झाडे डौलाने उभी आहेत.

झाडांचे वाढदिवस

पणदरे ग्राम विकास मंचाच्या माध्यमातून हजारो झाडे लावली आहेत. यामधील काही झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT