दीपक सोनवणे
पौड : मुळशी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या प्रारूप रचनेमध्ये गाव दुसर्या गटात गेल्याने निवडणूक लढण्यासाठी तयारी केलेल्या माननीयांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. 8 जूनपर्यंत आराखड्यावर नागरिकांना सूचना व हरकती दाखल करता येणार असून आता आरक्षणांकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
मुळशी तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेला तीन गट तर पंचायत समितीला सहा गण होते. आता चार गट तर आठ गण अस्तित्वात आले आहेत. मुळशी आणि कोळवण भागात असणारे पौड हे कासारआंबोली गणात मिळविण्यात आले. माण घोटावडे गणातील माण स्वतंत्र गण झालेला आहे. माण गणात लवळे गाव घेण्यात आलेले असून माण- कासारआंबोली जिल्हा परिषदेचा नवीन गट अस्तित्वात आलेला आहे. भूगाव गणात भूगाव, भुकूम आणि पिरंगुट ग्रामपंचायतीचे तीन वॉर्ड घेण्यात आलेले आहेत.
पिरंगुटचे इतर तीन वॉर्ड मुठा खोर्याला जोडण्यात आलेले आहेत. पिरंगुट – भूगाव हा एक गट तयार करण्यात आलेला आहे. कासारसाई नवीन गण तयार करण्यात आलेला असून नेरे व घोटावडे रिहे खोर्यातील गावे असून हिंजवडी गणात मारूंजी, जांबे गावासह कासारसाई – हिंजवडी गट तयार करण्यात आलेला आहे. तर कोळवण गण आणि माले गण मिळून एक गट तयार झालेला आहे.
आताचे नवीन निर्माण झालेल्या माले कोळवण गटात, हिंजवडी कासारसाई गटात किंवा पिरंगुट भूगाव गटात निवडणूक लढविण्याचे अनेक माननीयांचे मनसुबे धुळीस मिळाले असून यांची गावे कासारआंबोली – माण गटात आल्याने तसेच आरक्षण सोडतही अजून बाकी असल्याने या माननीयांना या गटात लढावे लागणार किंवा आपले गाव व गट सोडून पूर्वी काम केलेल्या ठिकाणी लढावे लागणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणारआहे.
हेही वाचा