पुणे

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : ‘बॉम्बस्फोटाचा आवाज ऐकला’,साक्षीदाराची साक्ष

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'मी बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचा आवाज ऐकल्यानंतर धावत खाली गेले आणि लोकांची सुटका करण्यासाठी मदत करू लागले. मात्र, मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिले नाही,' अशी साक्ष कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील साक्षीदार असलेल्या एका महिला डॉक्टरने विशेष न्यायालयात दिली.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 फेब-ुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि 56 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात 'इंडियन मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याला अटक केली आहे. भटकळनेच बॉम्ब ठेवल्याचे 'सीसीटीव्ही'वरून निष्पन्न झाले होते.

एटीएसने यासीन भटकळ, मिर्झा हिमायत बेग यांच्यासह सात जणांवर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहेे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सोमवारी सर्व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतले. भटकळतर्फे बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अ‍ॅड. एस. व्ही. रणपिसे आणि अ‍ॅड. यशपाल पुरोहित यांची नियुक्ती केली आहे.

या प्रकरणात भटकळच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत जर्मन बेकरीच्या मालकीण स्मिता खरोसे यांच्यानंतर मंगळवारी जर्मन बेकरीजवळ क्लिनिक असलेल्या एका महिला डॉक्टरची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. यामध्ये संबंधित महिला डॉक्टरने 'जोरदार धमाक्याचा आवाज झाल्यानंतर मी खाली आले आणि लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र, मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिले नाही,' अशी साक्ष दिल्याचे बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. पुरोहित यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT