पुणे

केंद्र सरकारने करावा सोपानकाका पालखीमार्ग; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

अमृता चौगुले

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराज पालखी मार्ग केंद्र सरकारने ताब्यात घेऊन उत्तम दर्जाचा रस्ता करावा, अशी मागणी जपा युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. संत सोपानकाका यांची पालखी सासवड, पांगारे, मांडकी, निंबुत, कोर्‍हाळे बु., बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, भंडी शेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरला जाते.

तसेच संत चांगावटेश्वर पालखी सासवड, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, वाघापूर, शिंदावणेमार्गे बोरीऐंदी, तद्नंतर संत तुकाराम महाराज पालखीमार्गे जात असते. सध्या हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तो केंद्राकडे वर्ग करून घेत त्याचे पालखी महामार्गाप्रमाणे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार प्रदीप रावत, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, श्रीकांत थिटे, आदेश भुजबळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT