पिंपरी : प्लेटलेट चाचणीसाठी आता 9,500 रूपये शुल्क

पिंपरी : प्लेटलेट चाचणीसाठी आता 9,500 रूपये शुल्क

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रक्तपेढीत अफेरेसीस पद्धतीने प्लेटलेस (सिगल डोनर प्लेटलेट) तयार केले जातात. या चाचणीसाठी आता 9 हजार 500 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 12 फेब्रुवारी 2014 च्या पत्रानुसार रक्त व रक्तघटकांसाठी आकारावयाच्या चाचणी शुल्काबाबत मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अफेरेसीस पद्धतीने संकलित करण्यात येणार्‍या प्लेटलेटचे अशासकीय रक्तपेढ्यांसाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण करून आकारण्यात येणार्‍या सुधारित प्रक्रिया शुल्काबाबतचे परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाने 25 जून 2014 ला प्रसिद्ध केले आहे.

शासकीय रक्तपेढ्यांमध्ये अफेरेसीस मशिनची सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्लेटलेट प्रक्रिया शुल्क 9 हजार रूपये आकारण्यास 27 मे 2021 ला शासनाने मान्यता दिली आहे. त्या नियमानुसार पालिका आता शुल्क आकारणार आहे. त्यात एनएटी व इतर चाचण्यांचा समावेश असणार नाही. त्या चाचण्यांसाठी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य शासनाने निश्चित केलेले दर लागू राहतील.
वायसीएम रूग्णालयातील रक्तपेढीतील अफेरेसीस पद्धतीने प्लेटलेट चाचणी केली जाते. त्यात स्वयंचलित यंत्राद्वारे रक्तदात्यांकडून संकलित केलेल्या रक्तांमधील विविध आजाराच्या तपासण्या केल्या जातात. या तपासणीसाठी 9 हजार 500 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news