पुणे

कवठे येमाई येथे नेपाळी तरुणाची आत्महत्या

अमृता चौगुले

टाकळी हाजी, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील एका खोलीत वास्तव्यास असणारा मुक्ता बहादुर कामी (वय 35) याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी कृष्णा सुरत खतीवाडा (वय 34, रा. तारुका, जि, नुवाकोट, नेपाळ, हल्ली मुक्काम कवठे येमाई, ता. शिरूर) याने शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना शनिवारी (दि. 11) उघडकीस आल्यानंतर शिरूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस जवान दीपक पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ता बहादुर कामी याने फिर्यादी यांना फोन करून सांगितले होते की,

त्याला त्याची पत्नी कल्पना व मेहुणा लोकबहादूर बिका (रा. पुणे) हे दोघे त्रास देतात. या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांचेविरुद्ध कृष्णा याने तक्रार दिली आहे. शिरूर पोलिसांत या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले तपास करीत

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT