पुणे

करुणा शर्मा यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: विवाहित तरुणीला जातिवाचक शिवीगाळ करत हॉकी स्टीकचा धाक दाखवला. तसेच तिने पतीला घटस्फोट द्यावा, यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी करुणा शर्मा (43, रा. मुंबई) यांच्यावर पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेच्या पतीवर कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. फिर्यादी या येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी व आरोपी पती यांचे 2018 मध्ये लग्न झाले आहे. आरोपीला पत्नीपासून घटस्फोट पाहिजे होता.

करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. याच कारणातून पत्नीने घटस्फोट द्यावा म्हणून तो आणि करुणा शर्मा हे फिर्यादीस त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तेवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर करुणा शर्मा यांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अनैसर्गिक अत्याचार करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT