पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा दणका सुरुच आहे. त्यांची ४ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. विदेशी चलन नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत भोसले यांच्या कंपनीशी संबंधित जमिनीवर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने सोमवारी दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अविनाश भोसलेंना ईडीचा दणका बसणे सुरुच असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ईडीने फेब्रुवारीमध्ये भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील घर, कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यावेळी भोसले यांचा मुलगा अमित याला ताब्यात घेतले होते.
ईडीने त्यांची आठ तासांहून अधिक काळ कसून चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जून महिन्यात भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.
भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (एबीआयएल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने जमीन आणि कार्यालये आहेत. यापैकी ४ कोटींची स्थावर मालमत्ता आता ईडीने जप्त केली आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : तुझ्या तिरडीचा मोडला बांबू