बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेचा प्रयत्न, गुन्हे दाखल | पुढारी

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेचा प्रयत्न, गुन्हे दाखल

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव मधील सह्याद्री नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेचा प्रयत्न करण्यात आला होता. महापालिका आणि पोलीस यांनी या प्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.

महापालिकेच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. असा आरोप महापालिका व पोलिसांकडून करण्यात आला. त्यानंतर महापलिका आणि पोलिसांकडून या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा पोलिसांचा आरोप या दाखल केलेल्या गुन्ह्यात करण्यात आला आहे. सुमारे तीस जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची एपीएमसी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोकणी खेकडा फ्राय रेसिपी 

Back to top button