केस वाळवायला गच्चीवर गेली आणि तोल जाऊन खाली पडली! पुण्यातील घटना

केस वाळवायला गच्चीवर गेली आणि तोल जाऊन खाली पडली! पुण्यातील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केस वाळवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेली एक 14 वर्षाची मुलगी तोल जावून खाली पडली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ती इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलला लटकली.

दरम्यान तिच्या मैत्रिणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने तरुणीला पकडण्यासाठी साडी सोडली. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. 15 मिनीटे सेक्स्यु ऑपरेशन राबत मुलीची जवानांनी सुखरुप सुटका केली. शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी हा थरार अनेकांनी अनुभवला.

जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवले

केस वाळवायला गच्चीवर गेली आणि अडकल्याची अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी वर्दी मिळाली. एक मुलगी खिडकीच्या ग्रिलला अडकली असल्याचे सांगण्यात आले. अवघ्या 5 मिनिटात अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली.

तेव्हा त्यांनी पाहिले की, एक मुलगी चौथ्या मजल्यावर एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन उभी असून तिने साडीला धरुन ठेवले आहे. या मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडू शकते अशी स्थिती होती.

ते पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवले. त्यानंतर काही जण वरच्या मजल्यावर जाऊन त्यांनी तेथून रस्सी तिच्याकडे टाकली. तोपर्यंत दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी शिडी लावून त्यावरुन जवान तिच्यापर्यंत पोहचले.

जवानांनी तिला पकडून खाली आणले. याबाबत तिच्या नातेवाईकाकडे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ती टेरेसवरुन पाय घसरुन पडली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

केस वाळवायला गच्चीवर गेली

खिडकीचे ग्रील हे भिंतीपासून अगदी थोडे पुढे आहे. सुदैवाने त्यामध्ये तिचा पाय त्या ग्रीलला लागल्याने ती बचावली. ज्या खिडकीच्या ग्रीलला ती अडकली होती. तेथील महिलेने तिचा पाय धरुन ठेवला. तर वरच्या मजल्यावरील खिडकीतून साडी सोडण्यात आली. ती धरुन ही मुलगी उभी राहिली होती.

घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले.

मुलीच्या घरच्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, मुलगी केस वाळविण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी अचनाक तोल गेल्यामुळे ती खाली आली आणि खिडकीच्या ग्रीलला अडकली.

या कामगिरीमध्ये अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांनी सहभाग घेतला.

हे ही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news