पुणे

अल्पवयीन शाळकरी मुले दुचाकीवर

अमृता चौगुले

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवा सुरू झाली असतानाही शाळेत येणारी अल्पवयीन मुले दुचाकी गाड्या घेऊन येत आहेत. परिणामी अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागात कोरोना कालखंडामध्ये पूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर वाहतूक सेवा पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी लागला. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राची धमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने ग्रामीण भागातील मुलांना शाळेत येणे गैरसोयीचे झाले होते.

त्यावेळी नारायणगाव परिसरातील ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना नारायणगाव या ठिकाणी येण्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती. परिणामी काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी दुचाकी दिल्या होत्या. मुलांचे शाळेमध्ये होणारे तास, परीक्षा या कालावधीत असल्याने सर्रास अल्पवयीन मुले गाडी घेऊन शाळेत येत असताना चित्र पहावयास मिळत होते.

मुलांची शैक्षणिक अडचण समजून पोलिस प्रशासनाने याकडे थोडासा काणाडोळा केला होता; मात्र आता ग्रामीण भागात संपूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून वाहतूक व्यवस्थाही पूर्ण क्षमतेने चालू झाली असतानाही अल्पवयीन मुले सर्रासपणे शाळेत गाड्या घेऊन येत असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT