सोलापूर : प्लास्टिकपासून उपयोगी सीट बनविण्याचे यंत्र | पुढारी

सोलापूर : प्लास्टिकपासून उपयोगी सीट बनविण्याचे यंत्र

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा येथील ए. जी. पाटील तंत्रनिकेतनमध्ये पर्यावरणाला घातक ठरणार्‍या टाकावू प्लास्टिकपासून उपयोगी वस्तू बनवणारे यंत्र तयार केले आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. प्लास्टिकच्या शिटपासून टेबल स्टूल व इतर फर्निचर बनविता येणार आहे. आपल्या देशात दर वर्षी 10 कोटी पेक्षा जास्त प्लास्टिक बॉटल्स टाकले जातात. प्लास्टिक हे वर्षानुवर्षे न विघटन होता पृथ्वीवर राहू शकते; त्यामुळे प्लास्टिकच्या कचर्‍याचे विल्हेवाट लावणे हे संपूर्ण जगासमोर खुप मोठी अव्हान म्हणून उभे राहिले आहे.

असे असताना प्लास्टिकच्या विघटनाला एक पर्याय म्हणून ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजि. विभागातील तृतीय वर्षात शिकणार्‍या प्रथम अंगडी, निखिल माळी, व्यंकटेश पतंगे व शिवराज चप्पळगे या विद्यार्थ्याच्या समुहाने टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून प्लास्टिक शिट बनविणारे यंत्र तयार केले आहे. सदर यंत्राच्या साहाय्याने टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या व त्यांचे टोपण यापासून प्लास्टिकचे शिट बनविण्यात येते.

प्लास्टिकच्या शिटपासून टेबल स्टूल व इतर फर्निचर बनविले जाऊ शकते. यामुळे फर्निचरकरिता वापरण्यात येणार्‍या लाकडाला हे प्लास्टिकचे शिट पर्याय ठरू शकते. यामुळे जंगलतोड थांबण्यास, पर्यायाने पर्यावरणाची निगा राखण्यास मदत होऊ शकते, असे या प्रकल्पाचे मार्गदर्शक प्राध्यापक जावेद धालाईत यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना धालाईत यांच्यासह मेकँनिकल इजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन कुमार मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले.संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले आदीनी या प्रकल्पाबाबत सर्व विद्यार्थी, प्रकल्प मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. पर्यावरणपूरक प्रकल्प सादर करुन ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button