पुणे

अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून; नाणेकरवाडी येथील प्रकार

अमृता चौगुले

चाकण : पुढारी वृत्तसेवा: चाकणजवळील नाणेकरवाडी (ता. खेड) येथे एका सतरावर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.26) दुपारी घडली असल्याचे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रीतीकुमारी संतोष साह (वय 17 , सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, मूळ रा. फतेपूर बिहार) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. प्रीतीकुमारी रविवारी दुपारी एकटीच घरी असताना एक तरुण घरात शिरला, त्याने घराचे दार लावून घेतले, त्याने या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी भेट दिली. चाकण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. संबंधित तरुणीवर खुनापूर्वी अत्याचार झाले होते का? याबाबत शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीनंतर स्पष्टता येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी खून झालेल्या तरुणीच्या बिहार येथील गावातीलच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT