पुणे

अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही; पालिकेच्या शाळांतील चित्र

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या 136 शाळांपैकी केवळ 60 शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. मात्र, एकाही शाळेत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही, असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांच्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करून घेण्याचे व ती यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश शासनाने दिले असतानाही महापालिकेने अद्याप ते केले नसल्याचेे समोर आले आहे.

अलीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व शाळा 13 जूनपासून सुरू करण्याचे आदेश काढले. तत्पूर्वी, राज्य शिक्षण संचालकांनी सर्व शाळांमधील अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याचे व आवश्यक दुरुस्त्या करून ती शाळा सुरू होण्यापूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते.

महापालिकेच्या शाळा अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट न करताच बुधवारी सुरू झाल्या. विशेष म्हणजे महापालिकेच्या 136 शाळांपैकी केवळ 60 शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. यासाठी 2 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही यंत्रणेला चार वर्षे झाली तरीही अद्याप ती कार्यान्वित नसल्याचा आरोप मनसेचे प्रशांत कनोजिया यांनी केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT