Women Sub Registrar Pudhari
पुणे

Pune Women Sub Registrar Office: महिला दिनानिमित्त पुण्यात दुय्यम निबंधक कार्यालयांचा कारभार महिलांकडे

11 कार्यालयांमध्ये महिला कर्मचारीच सांभाळणार जबाबदारी; महिला पक्षकार व वकिलांसाठी विशेष उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे सारथ्य महिला कर्मचारीच सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कारभार महिलांच्याच हाती असणार आहेत. त्यातही शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी महिलांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या 11 सह दुय्यम निबंधक कार्यालये केवळ महिला पक्षकार व महिला वकिलांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत. सह दुय्यम निबंधक हवेली क. 1, 2, 5, 7, 10, 11, 14, 15, 19, 26 व 27 ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सदर सर्व कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम पाहणार आहेत.

दरम्यान वरील कार्यालयांशिवाय सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 17, 21, 22, 23 व 25 ही कार्यालये या दिवशी नियमित दस्तांच्या नोंदणीसाठी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. या कार्यालयातही दुय्यम निबंधक म्हणून महिला कर्मचारी म्हणून काम करतील.

महिला दिनानिमित्त...

महिला दिनानिमित्त या कार्यालयांमध्ये केवळ पुढील प्रकारचे दस्त नोंदणीसाठी स्वीकारले जातील. ज्यात महिला खरेदीदाराच्या मालमत्तेचे खरेदीखत/करारनामे दस्तांची नोंदणी (शासन अधिसूचनेनुसार मुद्रांक शुल्कामध्ये 1% सवलत देय असलेले दस्तऐवज)

महिला पक्षकारांच्या मृत्युपत्राचा दस्त

महिला पक्षकारांच्या लाभातील कुलमुखत्यारपत्रांचे दस्त ज्या दस्तांमध्ये पक्षकार महिला नसतील, परंतु ओळख देणारी महिला वकील असेल, असे सर्वसाधारण दस्तऐवज महिलांना मालमत्ता हक्क व कायदेशीर सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सर्व महिला पक्षकार व महिला वकिलांनी या विशेष उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी हिंगाणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT