पुणे

कुरकुंभ ड्रगप्रकरणी सत्ताधारी गप्प का : संजय मोरे यांचा सवाल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता एमडी ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब झाले आहे. ललित पाटील प्रकरण अजूनही ताजे असताना शहरात 1850 किलो एमडी ड्रग्स आणि दिल्लीत पाठवलेले 970 किलो ड्रग्ज सापडले आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री गप्प का, असा सवाल शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. कोणताही कारखाना सुरु करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्या घेणे आवश्यक असते.

कारखान्यांमध्ये ड्रग तयार होत असताना मंडळातील अधिकारी काय करत होते, असा प्रश्न करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक अधिका-यांचे तातडीने निलंबन करावे अशी मागणी मोरे यांनी केली. यावेळी गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते . मोरे म्हणाले, 'कारवाईबाबत पुणे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र, या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पर्यावरण मंत्री आहे की नाही हे शोधावे लागेल. अजित पवार पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटून नाहीतर गाडी अडवून याबाबत शिवसेनेच्या वतीने आम्ही नक्कीच विचारणा करणार

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT