Milk Pudhari
पुणे

White Revolution 2.0: श्वेतक्रांती 2.0 ने दुग्धक्षेत्रात मोठी झेप; महाराष्ट्रात 2029 पर्यंत 2,500 नव्या दूध संस्था

देशात 75 हजार बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था; शेतकरी व महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी आराखडा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशात सहकाराच्या माध्यमातून ‌‘श्वेतक्रांती 2.0‌’द्वारे दुग्धक्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे. या योजनेअंतर्गत देशात 75 हजार नव्या बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था (एम-पॅक्स) स्थापन करण्यात येणार आहेत. तर, महाराष्ट्रात 2029 पर्यंत जवळपास अडीच हजार नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत दिली.

खासदार सीमा द्विवेदी यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या योजनेचा आराखडा व प्रगती सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना ग््राामीण अर्थव्यवस्थेला बळ देईल. त्यातून रोजगार-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी व महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील,‌’ असा विश्वास या वेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, ‌‘श्वेतक्रांती 2.0‌’ देशाची दूध उत्पादनक्षमता दररोज 660 लाख किलोग््राामवरून एक हजार लाख किलोग््राामपर्यंत वाढविण्यावर सक्रिय काम केले जात आहे.

देशात आत्तापर्यंत 22 हजार बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था स्थापन झाल्या आहेत. त्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत असंघटित क्षेत्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून दुधाचा योग्य दर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या योजनेत महिला सक्षमीकरणावर विशेष भर आहे. प्रारूप उपविधींमध्ये बदल करून सहकारी संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत महिला व अनुसूचित जाती-जमातीच्या घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद

‌‘महाराष्ट्रात सध्या 12 हजार 600 दूध सहकारी समित्या कार्यरत आहेत. येत्या चार वर्षांत अडीच हजार नव्या समित्या स्थापन करण्यात येतील तसेच 4 हजार 200 कार्यरत समित्यांचे सक्षमीकरण केले जाईल. याशिवाय देशातील सर्व राज्यांमध्ये नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

दूध संस्थांना मिळणार अर्थसाह्य

‌‘नॅशनल प्रोग््रााम फॉर डेअरी डेव्हलपमेंट ( छझऊऊ) अंतर्गत नव्या व सध्या कार्यरत असलेल्या सहकारी संस्था व समित्यांना दूधसंकलन व परीक्षणासाठी उपयुक्त यंत्रसामग््राी व उपकरणे देण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख 86 हजार रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या अपार कष्टामुळेच भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश झाला आहे. शेती क्षेत्राच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पशुधनाचा वाटा 25 टक्के असून, ‌‘सहकारातून समृद्धी‌’ या संकल्पनेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT