पुणे

मंत्री चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात..

Laxman Dhenge

पुणे : मंत्री चंद्रकात दादांचा वडिलधारेपणा शिवाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांना आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.
लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ०७ आणि १४ मधील पदाधिकाऱ्यांसोबत आज दादांची बैठक झाली.‌ पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा लोकसभा निवडणुकीत ४००+ खासदारांचा संकल्प आहे. मोदीजींचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाची आस, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क करावा, असे आवाहन दादांनी या वेळी केले.

या बैठकीत पक्षाच्या पदाधिकारी अमृता म्हेत्रे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दादांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली. अन् बैठकीनंतर त्यांना आपल्याकडील आयुर्वेदिक औषधी गोळ्या देऊन औषध घेण्याची सूचनाही वडिलकीच्या नात्याने केली. दादांची संवेदनशीलता उपस्थित सर्वांनाच भावली. या बैठकीला राजेश पांडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, गणेश बगाडे, रवी साळेगावकर, कुलदीप सावळेकर, शामराव सातपुते, सुतीज गोटेकर यांच्यासह मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते

हेही वाचा

SCROLL FOR NEXT