पृथ्वीचे वजन किती आहे?

पृथ्वीचे वजन किती आहे?
Published on
Updated on

नवी दिल्ली : अंतराळात अधांतरी तरंगत असलेल्या खगोलांचे वजन किंवा वस्तुमान संशोधक कसे शोधतात हा एक आपल्यासारख्या सामान्य लोकांसमोर पडलेला चिमुकला प्रश्न असतो. अर्थातच, त्याची एक वैज्ञानिक पद्धतही असते. बाकीच्या खगोलांचे जाऊ द्या, आपण ज्या ग्रहावर राहतो, त्या पृथ्वीचे वजन किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

या पृथ्वीतलावर अनेक पर्वत, जंगले, महासागर आणि अब्जावधी जीवजंतू आहेत. या सर्वांना धारण केलेल्या पृथ्वीचे वजन किती असेल, याबाबत सर्वांनाच कुतूहल असू शकते. संशोधकांच्या माहितीनुसार, पृथ्वीचे वजन तिच्यावर असलेल्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे, जे अब्जावधी किलो असू शकते. लाईव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, पृथ्वीचे वजन 5.9722 गुणिले 1,024 किलोग्रॅम किंवा सुमारे 13.1 सेप्टिलियन पौंड आहे. हे वजन इजिप्तमधील खाफ्रे पिरॅमिडपेक्षा सुमारे 13 क्वाड्रिलियनच्या बरोबरीचे आहे. या पिरॅमिडचे वजन 4.8 अब्ज किलो आहे. अंतराळातील धूळ आणि आपल्या वातावरणातून निघणार्‍या वायूंमुळे पृथ्वीच्या द्रव्यमानात थोडा चढ-उतार होत असतो. मात्र, हे छोटे बदल पृथ्वीला अब्जावधी वर्षांपर्यंत प्रभावित करीत नाहीत.

जगभरातील भौतिक वैज्ञानिकांचे मत आहे की, पृथ्वीचे वजन कोणत्याही पद्धतीने मोजणे शक्य नाही. त्याचे कारण म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. त्याच्या आधारावर तापमान ठरते. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार, प्रत्येक वस्तू, ज्यामध्ये द्रव्य असते, त्यात गुरुत्वाकर्षण बळही असते. याचा अर्थ कोणत्याही वस्तूमध्ये नेहमी विशिष्ट बल असते. वजनही एक बळच आहे जे मोजण्यासाठी नेहमी गुरुत्वाकर्षण शक्तीची गरज पडते. अशावेळी तुम्ही कोणत्या भागाचे वजन करता, त्यामधील गुरुत्वाकर्षण कसे आहे हे जाणून घ्यावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news