रविवारी शहरातील चौका-चौकांत दिवसभर वाहतूक कोंडीमुळे नागरीक हैराण झाले होते. वाहनांतून निघणारे धुलीकणामुळे प्रदूषण टिपेला पोहोचले होते. शिवाजी रस्त्यावरचे हे बोलके दृष्य. Pudhari
पुणे

Pune Air Pollution: विकेंडच्या गर्दीमुळे पुण्यात हवा प्रदूषणाचा उच्चांक

रविवारच्या वाहतूक कोंडीमुळे शिवाजी रस्ता, हडपसर आणि पाषाणसह शहरातील प्रदूषण वाढले

पुढारी वृत्तसेवा

पुणेः रविवारच्या गर्दीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा सर्वोच्च प्रदूषित पातळीवर गेली होती. डिसेंबरमधील हवा प्रदूषणाचा उच्चांक नोंदला गेला.

शहरातील हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी शहरातील सर्वंच भागात गर्दी असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. प्रामुख्याने शिवाजी रस्ता गर्दीने फुलून गेला होता. हडपसर, नगर रस्ता, पाषाण, लोहगाव, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर या भागातील हवा प्रदूषणात मोठी वाढ झालेली दिसत होती.

सात दिवसांतील हवा प्रदूषणाचा आलेख...

तारीख------------हवेची गुणवत्ता

१ डिसेंबर----------२१६

२ डिसेंबर----------२२८

३ डिसेंबर --------२३६

४ डिसेंबर---------२२९

५ डिसेंबर---------२१४

६ डिसेंबर---------२५०

७ डिसेंबर ---------२७०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT