पुणे

पुणे: मंगल कार्यालयातील लग्न बनले खर्चिक, कोरोना काळात बंद पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यांची पुन्हा गरज

अमृता चौगुले

मंचर, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला. सध्या वैयक्तिक लग्न मंगल कार्यालयांमध्ये करताना आर्थिक बोजा या कार्यमालकांवर पडत आहे. मंगल कार्यालयातील लग्न हे खर्चीक बनले आहे. त्यामुळे कार्यमालक धुमधडाक्यात लग्न केल्यानंतर मात्र आर्थिक संकटातच जात आहेत.

विवाह सोहळ्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, सर्वच मंगल कार्यालये फुल आहेत. लग्नतारखेला कार्यमालक मुला-मुलींचे विवाह मंगल कार्यालयात करून घेण्याकडे कल वाढला आहे. सामुदायिक विवाह होताना मात्र खूप अल्प प्रमाणात दिसून येत आहे. आपल्या मुला-मुलीचे लग्न धुमधडाक्यात करण्याकडे सर्वच पालकांचा कल आहे. परंतु धुमधडाक्याच्या नादात मात्र कर्जाच्या खाईत अनेक वधू-वरांचे पालक जात असल्याचे दिसून येत आहे. खर्‍या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळ्यांची चळवळ चांगल्या स्वरूपात उभी राहिली होती. परंतु कोरोनाच्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला. कोरोनानंतर ते सुरू होतील असे वाटले होते. मात्र तसे घडलेले नाही. परिणामी, गरीब पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. प्रामुख्याने शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत आहे.

ग्रामीण भागातील जनतेने कमी खर्चीक लग्नसोहळे करावेत. सामुदायिक विवाह सोहळे पुन्हा सुरू करावेत, जेणेकरून आर्थिक खर्चाला फाटा मिळेल. एकंदरीत सध्या सुरू असलेली ही वैयक्तिक विवाहांची पद्धत अनेकांना परवडत नाहीत.
– अनिल कानडे, शेतकरी, कळंब.

विवाह सोहळे अंतिम टप्प्यात आले असून, काहीच तारखा शिल्लक आहेत. या तारखा ही फुल असून, कालखंडामध्ये पुन्हा एकदा सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी अनेक सुज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे.
-अशोक बाजारे, सामाजिक कार्यकर्ते, सातगाव.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT