पुणे

Weather Update : विदर्भात थंडीची लाट; नागपूरसह यवतमाळ 9 अंशांवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील किमान तापमान 8 ते 4 अंशांपर्यंत खाली आले असून, तेथून राज्यात शीतलहरी येण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंगळवारी विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ या शहरांचे तापमान 9 अंशांपर्यंत खाली आले होते. बुधवारपासून राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप बेटावर चक्रीवादळाची तयारी सुरू झाल्याने पुन्हा वातावरणात नवे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. काश्मीरमध्ये तामपान उणे असून, तेथे बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 8 ते 4 अंशांपर्यंत खाली आले आहे.

मंगळवारचे राज्याचे तापमान

गोंदिया 9, यवतमाळ 9, नागपूर 9.4, वाशिम 10, वर्धा 11.4, ब्रह्मपुरी 11.4, बुलडाणा 12.8, अमरावती 12.5, महाबळेश्वर 12.6 अकोला 13.5, बीड 14.5, पुणे 15.2, नगर 16.3, कोल्हापूर 19, मालेगाव 14.6, नाशिक 14, सांगली 18.9, सातारा 16.5, सोलापूर 18, धाराशिव 16.6, छत्रपती संभाजीनगर 15.9, परभणी 13.5, नांदेड 16.2, बीड 14.5.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT